मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गौरवशाली ऐतिहासिक पदवीदान सभागृहाचा वारसा जतन करण्यासाठी महानगर गॅसने पुढाकार घेतला आहे. मुंबई विद्यापीठाचे पदवीदान सभागृह वातानुकूलित करण्यासाठी महानर गॅस लिमिटेडने 1 कोटीचे अर्थसाहाय्य देऊ केले आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला असून, लवकरच त्याला मूर्त स्वरूप मिळणार आहे.
मुंबई शहराला शैक्षणिक वारसा देण्याचे काम विद्यापीठाने केले आहे. विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ याच पदवीदान सभागृहात पार पडतो. अधिसभा, विद्वत सभा, अनेक शैक्षणिक उपक्रम, चर्चासत्रे, कार्यशाळा, महत्त्वाच्या बैठका या सभागृहात होतात. शहराचे भूषण असलेल्या पदवीदान सभागृहाला 2क्क्7 साली युनेस्कोकडून आशिया पॅसिफिक हेरीटेज कन्झर्वेशन पुरस्कार मिळाला आहे.
या भव्य वास्तूचे जतन व्हावे यासाठी महानगर गॅसने पुढाकार घेतला आहे. कंपनीने दिलेल्या प्रस्तावावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय होणार असून, यानंतरच पदवीदान सभागृह गारेगार होणार आहे. (प्रतिनिधी)
च्पदवीदान सभागृह सर कावसजी जहांगीर यांनी दिलेल्या देणगीतून उभारले आहे. त्याची बांधणी 13व्या शतकातल्या फ्रेंच गॉथिक शैलीतील आहे. त्याचे बांधकाम 1869मध्ये सुरू होऊन 1874 साली पूर्ण झाले. मुख्य सभागृह 1क्4 फूट लांब आणि 44 फूट रुंद आणि 63 फूट उंच आहे.
च्प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर भव्य कमानी असलेल्या उत्कृष्ट, गोलाकार, स्टेण्डग्लास खिडक्या आणि उत्तरेकडील टोकाला 12 राशींच्या चिन्हांची चित्रे दिसतात.