Join us

तीन अभ्यासक्रमांसाठी एकच सीईटी

By admin | Updated: May 31, 2015 02:10 IST

राज्यातील वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून एकच सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येईल,

मुंबई : राज्यातील वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून एकच सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येईल, अशी घोषणा वैद्यकीय आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एका कार्यक्रमात केली आहे. ही परीक्षा केवळ बारावी अभ्यासक्रमावरच आधारित असेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले आहे. यामुळे सीईटी परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी राज्य स्तरावर यापूर्वी एकच सीईटी परीक्षा घेण्यात येत होती. मात्र, केंद्रीय प्रवेश परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या सीईटींना सामोरे जावे लागत आहे. यंदा नीट रद्द झाल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राज्य स्तरावर स्वतंत्र एमएच-सीईटी घेण्यात आली आहे. याच धर्तीवर अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईईऐवजी राज्याची सीईटी घेण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केली होती. या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र सीईटी घेण्याऐवजी पूर्वीप्रमाणे एकच सीईटी घेण्यात यावी, अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती.या सीईटीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या चारही विषयांचा समावेश आहे. विषय गट निवडून सीईटी देता येत होती. त्याच धर्तीवर २0१६पासून एकच सीईटी घेण्यात येणार असल्याची घोषणा तावडे यांनी केली आहे.