Join us

‘कॅश व्हॅन’ टोळीतील एक जण ताब्यात

By admin | Updated: June 12, 2016 04:38 IST

बॅकेच्या ‘कॅश व्हॅन’चा वापर चोरीसाठी करणाऱ्या ‘कॅश व्हॅन’च्या कर्मचाऱ्यांकडे भांडुप पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. तसेच याच प्रकरणातील आरोपी विकी चव्हाण उर्फ बारक्यालाही

मुंबई : बॅकेच्या ‘कॅश व्हॅन’चा वापर चोरीसाठी करणाऱ्या ‘कॅश व्हॅन’च्या कर्मचाऱ्यांकडे भांडुप पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. तसेच याच प्रकरणातील आरोपी विकी चव्हाण उर्फ बारक्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. भांडुप पोलीस स्टेशन लगत असलेल्या एसएमएस कंपनीच्या या ‘कॅश व्हॅन’ आहेत. भांडुप पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक श्रीपाद काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली आहे. सायकल चोरीबाबत आपल्याला काहीही माहिती नसून आपण फक्त मित्राला लिफ्ट दिल्याची माहिती त्यांनी जबाबात दिली आहे. मात्र घटनास्थळावरील ३० मिनिटांच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपींचा प्रताप कैद झाला आहे. डकलाईन येथील रहिवासी असलेले प्रकाश नवले यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या सायकल चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी चोरी केल्या. त्यानंतर कॅश व्हॅनमध्ये चोरीच्या सायकल ठेऊन लुटारुंनी पळ काढला. याप्रकरणी मारहाणीच्या गुन्ह्यांत अटकेत असलेल्या चव्हाणकडे पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून यातील आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याचे काळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)