विक्रमगड : येथील उपविभागीय कार्यालय असताना या कार्यालयाच्या हद्दीत ८० ते ९० गावांचा समावेश आहे. गावातील वीज ग्राहकांची संख्या सुमारे २० ते २५ हजार इतकी असून हा बहुतांश भाग जंगलपट्टीचा आहे. यात आलोडा साखरे व विक्रमगड हे तीन फिडर येत असून या तीन फिडरसाठी एक शाखा कार्यालय काम पाहते. परंतु संपूर्ण जंगलपट्टीचा भाग असून या प्रत्येक फिडरसाठी स्वतंत्र शाखा कार्यालय असणे गरजेचे आहे. या ठिकाणी दोन शाखा कार्यालय आवश्यकता असताना एकावरच त्याचा अतिरिक्त भार येत असल्याने ग्राहकांना योग्य सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे. या संपूर्ण तालुक्यातील ग्राहकांची जबाबदारी फक्त १० वायरमन व १ जे.ई. यांच्यावर आहे. तालुक्यासाठी साखरे फिडरसाठी दोन वर्षापासून शाखा कार्यालयाची मागणी आहे. तसा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे, परंतु अजूनपर्यंत हा प्रस्ताव धूळखात आहे. महावितरणकडे अनेक तक्रारी, विनंती करूनही विक्रमगडसारख्या आदिवासी भागात कोणतीही सुधारणा करीत नाहीत. (वार्ताहर)
तीन फिडरसाठी एकच शाखा कार्यालय
By admin | Updated: August 18, 2014 00:11 IST