Join us

स्टेट बँक दरोडा प्रकरणी एकाला अटक

By admin | Updated: January 5, 2015 01:10 IST

बुलढाणा येथील बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोराला नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.

नवी मुंबई : बुलढाणा येथील बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोराला नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.बुलढाणा येथे स्टेट बँक आॅफ इंडियावर २६ डिसेंबरला ५ दरोडेखोरांनी बँकेवर सशस्त्र दरोडा टाकला होता. त्यामध्ये बँकेची ३० लाखांची रोख रक्कम लुटीला गेली होती. यासंबंधीचा गुन्हा साखरखेडा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणातील एका गुन्हेगाराचे नातेवाईक घणसोलीत राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त सुरेश मेंगडे व सहाय्यक आयुक्त रणजित धुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ने सापळा रचून शनिवारी रात्री घणसोली सेक्टर ३ येथून मदन भागडे (२३) ला अटक केली. तो जालना येथील सावरगावचा आहे. (प्रतिनिधी)