मुंबई : अवैधरीत्या शस्त्र घेऊन फिरणा:या आरोपीला नेहरूनगर पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी एक रिव्हॉल्वर आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
कुल्र्याच्या नेहरूनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि लूटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात रात्रीचा बंदोबस्त वाढवला आहे. शनिवारी रात्री अशाच प्रकारे नेहरूनगर पोलीस ठाण्याचे काही अधिकारी परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, येथील सेंट्रल कॉलनी परिसरात विलास बनपट्टे (28) हा आरोपी पोलिसांना संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला.
पोलिसांनी त्याला थांबवून त्याची विचारपूस केली असता तो पळून जाऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक रिव्हॉल्वर आणि पाच जिवंत काडतुसे आढळून
आली. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली असून त्याने हा शस्त्रसाठा कुठून आणला, याबाबत पोलीस त्याच्याकडे अधिक चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)