Join us
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यातून दीड लाख गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 06:42 IST

दादरमधील एका खासगी शिकवणीच्या संचालकाच्या खात्यातून अवघ्या काही मिनिटांतच दीड लाख रुपये काढल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

मुंबई : दादरमधील एका खासगी शिकवणीच्या संचालकाच्या खात्यातून अवघ्या काही मिनिटांतच दीड लाख रुपये काढल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस अधिक तपास करत आहेत. शिवाजी पार्क परिसरात तक्रारदार अजय पिंगे (४०) राहतात. त्यांची खासगी शिकवणी आहे. बँकेशी संबंधित काम असल्याने त्यांनी २० मार्च रोजी कस्टमर केअरचा नंबर शोधून फोन केला. त्या वेळी फोन घेणाऱ्या व्यक्तीने त्यांना विश्वासात घेऊन पिंगे यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यानंतर त्यांचा ओटीपी घेतला. त्यानंतर पाच वेगवेगळ्या व्यवहारांतून त्यांच्या खात्यातून दीड लाख काढले.