दीपक मोहिते - वसई
51 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या विरारच्या डोंगरावर वसलेल्या जीवदानी माता मंदिरामध्ये नवरात्रीनिमित्ताने विविध आध्यात्मिक उपक्रम राबवण्यात येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणा:या जीवदानी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून वर्षाकाठी कोटय़वधी भाविक भेट देत असतात.
विरारची जीवदानी देवी ही राज्यभरात प्रसिद्ध असून, दररोज हजारो भाविक 13क्क् पाय:या चढून या देवीचे दर्शन घेत असतात. सात बहिणींपैकी जीवदानी देवी एक आहे. काही वर्षापूर्वी या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. दर्शनासाठी येणा:या वृद्धांचे हाल लक्षात घेऊन विश्वस्त मंडळातर्फे डोंगरावर जाण्यासाठी ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आहे. काकड आरतीला उपस्थित राहता यावे याकरिता भाविक पहाटे 3 ते 4 वाजल्यापासून मंदिराच्या पाय:या चढू लागतात. घटस्थापनेदिवशी विविध आध्यात्मिक कार्यक्रमांस सुरुवात होते.
दर शनिवार व रविवारी मुंबई व ठाणो परिसरातून भाविक मोठय़ा संख्येने या परिसरात येत असतात. जीवदानी देवीमुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. या मंदिराची संपूर्ण जबाबदारी ठाकूर कुटुंबीयांकडे असून, या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आजवर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
सुरक्षेला प्राधान्य
च्डोंगरावर सीसीटीव्ही कॅमेरे.
च्सुरक्षेसाठी प्रचंड प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात,
4 मेटल डिटेक्टर, 6 हँडमेटल डिटेक्टर व 3क्क् कर्मचारी.
मंदिराचे वैशिष्टय़
च्51 शक्तिपीठांपैकी एक
च्पहाटे 3 ते रात्री 9 वाजेर्पयत मंदिर दर्शनासाठी खुले
च्घटस्थापनेदिवशी पहाटे 4 वाजता जीवदानी मातेस महाअभिषेक, वस्त्रलंकार, शृंगार, नैवेद्य, धुपारती
च्मंदिर ट्रस्टतर्फे वेबसाईटवर लाइव्ह दर्शनाची सोय