नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
महापालिकेच्या ऐरोली विभाग कार्यालयात शुक्रवारी मध्यरात्रीर्पयत ओली पार्टी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. पार्टीसाठी मोठय़ाप्रमाणात दारू आणण्यात आली होती. कार्यालयात विनापरवाना मटण बनविण्यात आल्याचेही समोर आले असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या सावळ्यागोंधळाविषयी लोकमतने वारंवार आवाज उठविला आहे. आयुक्त व मुख्यालय उपायुक्तांनी मेहनत करून चांगला आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. मुख्यालय, परिमंडळ व विभाग कार्यालयांमध्ये चोवीस तास मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. परंतु हे मनुष्यबळ योग्यप्रकारे काम करीत नसल्याचे समोर येऊ लागले आहे. ऐरोली विभाग कार्यालयाच्या तळमजल्यावर शुक्रवारी रात्री ओल्या पार्टीचे आयोजन केले होते. 1क् ते 12 जणांनी पालिकेच्या खोलीमध्ये विटांची चूल मांडून स्वयंपाक बनविण्यास सुरुवात केली
होती. पार्टीसाठी मटण बनविले
जात असताना दुसरीकडे मद्यपान
सुरू करण्यात आले होते.
यासाठी मोठय़ाप्रमाणात दारूच्या बाटल्याही आणल्या होत्या. या अनागोंदी कारभाराविषयी दक्ष नागरिकांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे रात्री 12 वाजता काही जणांनी विभाग कार्यालयात जाऊन पाहणी केली असता तेथे पार्टी सुरू असल्याचे निदर्शनास आले. पार्टीचे चित्रीकरण सुरू करताच तेथे उपस्थित असणा:यांचे धाबे दणाणले. तत्काळ खोलीतील वीजपुरवठा बंद करून त्यांनी बाहेर पलायन करण्यास सुरुवात केली. या खोलीमध्ये चूल मांडून त्यावर मटण ठेवल्याचे व एका बाजूला दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
ओली पार्टी करणारे महापालिकेचे कर्मचारी होते की दुसरे कोण याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे काम पाहण्यासाठी नेमणूक केलेल्यांनी ही पार्टी आयोजित केल्याचेही बोलले जात आहे. या प्रकारामुळे ऐरोली परिसरात खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या कार्यालयात झालेल्या या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
4शुक्रवारी रात्री झालेल्या ओल्या पार्टीविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी विभाग अधिकारी साहेबराव गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, सर्वप्रथम या प्रकाराची माहिती घेतो, माहिती घेऊन नक्की असा प्रकार घडला का याविषयी माहिती देतो असे सांगितले. दोन तासानंतर त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी थोडय़ा वेळाने फोन करतो असा एसएमएस पाठविला. या प्रकाराविषयी वास्तव माहिती द्यावी याविषयी एसएमएस पाठविला परंतु उशिरार्पयत त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.