Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओलेती मुंबई

By admin | Updated: June 20, 2015 00:00 IST

पावसात भिजण्याची हौस सगळ्यांना भागवता येत नाही. पण चार थेंब अंगावर घेण्याचा सोस कुणाला चुकलाय का?

एरवी धुळीने माखलेले रस्ते पावसाने धुतले आणि आरशासारखे लखलखीत केले.

मुंबई ठप्प झाली असली तरी अनेकांनी बंद काचांमागून पावसाचा आनंद लुटला.

पाऊस असो वा ऊन... पोटाची खळगी भरण्यासाठी गरीबांना हात पुढे करावाच लागतो...

क्वीन्स नेकलेस किंवा मरीन ड्राइव्हचा कट्टाही पाण्याखाली गेला.

गेट वे ऑफ इंडियाजवळ लाटा अंगावर घेण्यासाठी मुंबईकरांनी धाव घेतली. पोराटोरांनी तर विहीरीत माराव्या तशा उड्या समुद्रात मारल्या.

१५ दिवसांत पडणारा पाऊस एकाच दिवशी पडला आणि उन्हाची लाही लाही थांबली. पावसाचं आगमन साजरा करण्याचा हा एक अनोखा प्रकार.

शुक्रवारी १९ जून मुंबईकर जागा झाला तोच पावसाचा तडाखा झेलत. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी दिनी मुंबई बंद करून दाखवली ती वरुणराजाने. या ओलेत्या मुंबईच्या वेगवेगळ्या छटा टिपल्या आहेत पुरुषोत्तम चव्हाण यांनी...