Join us
Daily Top 2Weekly Top 5

कळंबचा जुना वाडा आगीत भस्मसात

By admin | Updated: June 21, 2015 23:06 IST

कर्जत तालुक्यातील कळंब गावामध्ये असलेल्या एका जुन्या वाड्याला शनिवारी रात्री आग लागली. या आगीमध्ये लाकडी साहित्याने बनलेल्या

नेरळ : कर्जत तालुक्यातील कळंब गावामध्ये असलेल्या एका जुन्या वाड्याला शनिवारी रात्री आग लागली. या आगीमध्ये लाकडी साहित्याने बनलेल्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून रस्त्यालगत असलेली दोन दुकाने देखील आगीत भस्मसात झाली. आगीत अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून आग विझवण्यासाठी गामस्थांना तीन तास मेहनत घ्यावी लागली. कळंब गावामध्ये विजय दत्तात्रय पौडवाल यांचा जुना वाडा आहे. सागवान लाकडी साहित्य याचा वापर करून बांधलेल्या या वाड्यात समोरच्या बाजूस पौडवाल हे किराणा दुकान असून सध्या ते भाड्याने चालवण्यास देण्यात आले आहे. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास या जुन्या वाड्याला आग लागली. ग्रामस्थांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तासांनंतर आग आटोक्यात आल्यावर अग्निशमन यंत्रणा, पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. रविवारी कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर, पोलीस उपअधीक्षक शालिग्राम पाटील, नायब तहसीलदार सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. महसूल अधिकारी व तलाठ्याच्या मदतीने पंचनामा पूर्ण करण्यात आला. (वार्ताहर)