Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकलच्या ट्रॅकवर उडी घेऊन वाचविला वृद्धाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:07 IST

पोलीस शिपाई एस.बी. निकम यांचे वरिष्ठांकडून कौतुकफोटो मस्ट आहे.लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकल पकडण्यासाठी पुलाचा वापर ...

पोलीस शिपाई एस.बी. निकम यांचे वरिष्ठांकडून कौतुक

फोटो मस्ट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लोकल पकडण्यासाठी पुलाचा वापर न करता रेल्वे ट्रॅकवरून निघालेल्या वृद्धाचा जीव शनिवारी स्वतःचा जीव धोक्यात घालून बोरिवली लोहमार्ग पोलिसात कार्यरत पोलीस शिपाई एस.बी. निकम यांनी वाचवला. वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले.

गणपत सोलंकी (६०) हे दहिसरमध्ये राहत असून काही कामानिमित्त खारला निघाले होते. त्यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आलेली धीमी लोकल त्यांनी पाहिली आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून ती पकडता यावी, यासाठी पुलाचा वापर न करता ४ क्रमांकाच्या ट्रॅकवर उडी मारली. मात्र, त्याच वेळी ३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर त्यांना विरार धीमी गाडी येताना दिसली. या गाडीखाली आपण चिरडले जाणार, या भीतीने गाेंधळले. त्यांना प्लॅटफॉर्मवर पुन्हा चढताही येत नव्हते. घाबरून ते तिथेच उभे राहिले.

निकम यांच्या हे लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ट्रॅकवर उडी मारून सोलंकी यांना खेचून वर घेतले आणि मागोमाग विरार लोकल त्या ट्रॅकवरून पुढे गेली. हा थरार प्लॅटफॉर्मवर असलेल्या अनेकांनी पाहिला आणि त्यानंतर निकम यांचे कौतुक केले.

सोलंकी यांना बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर त्यांच्या मुलासोबत घरी पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी सांगितले. सोलंकी यांच्या मुलानेही निकम व बोरिवली लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.

...........................................