मुंबई : सार्वजनिक शौचालयातून बाहेर येण्यास उशीर केला, म्हणून ६० वर्षीय फुलचंद यादव यांची हत्या करण्यात आल्याची घटना वडाळ्यात घडली. या प्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी साकीर अली शेख याला शुक्रवारी अटक केली आहे.वडाळा येथील संगमनेर परिसरात यादव राहात होते.बुधवारी रात्री ते नैसर्गिक विधीसाठी सार्वजनिक शौचालयात गेले. त्या वेळी शेख हा रांगेत होता. त्याने यादव यांचा दरवाजा ठोठावूनही ते लवकर बाहेर न आल्याने त्याने शिवीगाळ केली. यादव बाहेर येताच, त्यांनी जाब विचारला. यावरून दोघांत वाद झाला. रागाने शेखने त्यांना मारहाण केली. याच दरम्यान तो जवळच्या नाल्यात पडून त्यांचा मृत्यू झाला.
शौचालयातून बाहेर येण्यास उशीर झाल्याने वृद्धाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 06:21 IST