Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ हिंदी कवी हुल्लड मुरादाबादी कालवश

By admin | Updated: July 13, 2014 01:46 IST

हिंदीतील प्रसिद्ध कवी आणि नकलाकार हुल्लड मुरादाबादी (वय 72) यांचे शनिवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील निवासस्थानी निधन झाले.

मुंबई : हिंदीतील प्रसिद्ध कवी आणि नकलाकार हुल्लड मुरादाबादी (वय 72) यांचे शनिवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी कृष्णा चढ्ढा, मुलगा नवनीत, मुलगी सोनिया आणि मनीषा असे कुटुंब आहे.
साहित्य क्षेत्रत हुल्लड मुरादाबादी या नावाने सुपरिचित असणारे सुशील कुमार चढ्ढा यांचा जन्म 29 मे 1942 रोजी पाकिस्तानातील गुजरावाल येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुरादाबाद येथे स्थलांतरित झाले. सुमारे पंधरा वर्षापूर्वी त्यांनी त्यांचे घर विकले आणि ते मुंबईत आले.
बीएस्सीचे शिक्षण घेत असताना त्यांनी एमएची पदवी संपादन केली. शिक्षणादरम्यान सहकारी कवींसोबत तेदेखील कविता करू लागले. सुरुवातील त्यांनी वीर रसाच्या कविता लिहिल्या. नंतर ते हास्यकवितांकडे वळले. 1962 साली ‘सब्र’ या टोपणनावाने ते काव्य मंचाला सुपरिचित झाले. नंतर मात्र साहित्य क्षेत्र त्यांना हुल्लड मुरादाबादी या नावाने ओळखू लागले. शिवाय  ‘संतोष’ आणि  ‘बंधनबाहों’ या चित्रपटांतही त्यांनी अभियन केला.
इतनी ऊंची मत छोडो, क्या करेगी चांदनी, ए अंदर की बात हैं, त्रिवेणी, तथाकथित भगवानो के नाम, हुल्लड का हुल्लड, हजाम की हजामत आणि अच्छा हैं पर कभी कभी आदी साहित्य गाजले होते. (प्रतिनिधी)