Join us  

ओला कॅबमध्ये तरुणीवर बलात्कार, दोन आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 11:21 PM

काशिमीरा येथून एका ३० वर्षीय महिलेला मंगळवारी रात्री ओला कॅबमधून वज्रेश्वरी येथे नेऊन चालकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मीरारोड : काशिमीरा येथून एका ३० वर्षीय महिलेला मंगळवारी रात्री ओला कॅबमधून वज्रेश्वरी येथे नेऊन चालकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ओला चालकासह त्याच्या मित्रास अटक केली आहे. आरोपींनी तिच्याकडील रोख, डेबिट कार्ड व दागिनेही काढून घेतले होते.मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही महिला ठाणे येथे घरी जाण्यासाठी काशिमीरा पोलीस ठाण्यासमोरील बस स्थानकाजवळ थांबली होती. तेथे ती या ओला कॅबमध्ये बसली. त्यावेळी कारमध्ये चालकासह आणखी एक जण बसला होता. महिलेला धाक दाखवून तिच्याकडील रोख, अंगावरचे दागिने तसेच डेबिट कार्ड त्यांनी काढून घेतले. त्यानंतर चालकाने तिच्यावर बलात्कार केला.कॅबचालक सुरेश पांडुरंग गोसावी (३२) व त्याचा मित्र उमेश जसवंत झाला (३१, दोघेही रा. दहिसर) यांना अटक केली. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून संबंधित चालकाने ओलाचे बुकींग घेणे बंद केले होते, अशी माहिती पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली.

 

टॅग्स :बलात्कार