Join us  

‘ओखी’मुळे किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन, मुंबईत आकाश ढगाळ राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 5:55 AM

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत असतानाच, आता या वादळाचा फटका गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसणार आहे. हवामान खात्याने वादळामुळे गोव्यासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत असतानाच, आता या वादळाचा फटका गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसणार आहे. हवामान खात्याने वादळामुळे गोव्यासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा दिला आहे, शिवाय मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असेही आवाहन केले आहे. दुसरीकडे वादळाचा परिणाम म्हणून येत्या २४ तासांत दक्षिण कोकणात पाऊस पडेल. राज्यातही ठिकठिकाणी पाऊस पडेल आणि मुंबईचे आकाश अंशत: ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.तामिळनाडू आणि केरळला झोडपल्यानंतर ओखी चक्रीवादळ लक्षद्वीपकडे सरकले आहे. प्रामुख्याने दक्षिण भारताला वादळाचा फटका बसत असून, आता तर गोव्यासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘ओखी’ चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. चक्रीवादळाचा वेग वाढत असून, ३ डिसेंबर रोजी दक्षिण कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागांत हवामान कोरडे राहील. ४ डिसेंबर रोजी कोकण-गोव्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊसपडेल. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील.९५२ मच्छीमार सुखरूपओखी चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या बोटी सिंधुदुर्गच्या किनाºयावर सुखरूपपणे आणण्यात आल्या आहेत. त्यात ६६ बोटी केरळच्या असून २ तामिळनाडूच्या आहेत. विशेषत: ९५२ मच्छीमार सुखरूप असून, राज्याकडून संबंधितांना आवश्यक मदत करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र सागरी मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :मच्छीमारमुंबईमहाराष्ट्र