Join us
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांचे होणार मूल्यमापन

By admin | Updated: March 29, 2015 01:35 IST

काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला संधी देण्याची काँग्रेसची भूमिका आहे; परंतु पद मिळाल्यानंतर पदाधिकारी कसे काम करतात त्याचे नियमितपणे मूल्यमापन केले जाईल.

काम करू इच्छिणाऱ्यांना संधी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणमुंबई : काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला संधी देण्याची काँग्रेसची भूमिका आहे; परंतु पद मिळाल्यानंतर पदाधिकारी कसे काम करतात त्याचे नियमितपणे मूल्यमापन केले जाईल. काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.प्रदेश कार्यालयात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची चव्हाण यांनी घेतलेली ही पहिलीच बैठक होती. या वेळी चव्हाण म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची धुरा आपल्याकडे सोपविण्यात आली आहे. ती पार पाडण्यासाठी पक्षातील प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक आहे. संघटनात्मक पातळीवर कमकुवत असलेल्या जिल्ह्यांमध्ये पक्षाला अधिक बळकट करण्याच्या हेतूने विशेष मोहीम आखली जात आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पक्षाची परिस्थिती चांगली आहे, त्या ठिकाणी दुसऱ्या पिढीतील नेतृत्वाची सक्षम फळी उभारली जाईल. पक्षाचे कोषाध्यक्ष आ. डॉ. पतंगराव कदम, प्रदेश उपाध्यक्ष रोहिदास पाटील, माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित, रजनीताई पाटील, आ. शरद रणपिसे, सुधाकरराव गणगणे, मुश्ताक अंतुले, बाबू थॉमस, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमलताई व्यवहारे, सेवादलचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.