Join us
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील कृत्य करणाऱ्याविरोधात गुन्हा

By admin | Updated: August 27, 2015 04:36 IST

बोरीवलीमध्ये वीस वर्षीय तरुणीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या इसमाविरोधात दहिसर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा इसम चायनीझ रेस्टॉरंटमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत असून, तो फरार आहे.

मुंबई : बोरीवलीमध्ये वीस वर्षीय तरुणीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या इसमाविरोधात दहिसर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा इसम चायनीझ रेस्टॉरंटमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत असून, तो फरार आहे.कन्हैय्यालाल कलाल असे त्याचे नाव असून, तो मुळचा राजस्थानच्या डोगरपुरमधील सदवाडा परिसरातील रहिवासी आहे. दहिसर पोलिसांच्या माहितीनुसार, हा इसम बोरिवली पूर्वेकडील संत ज्ञानेश्वर मार्गावरील शांतीद्वार इमारतीमध्ये असलेल्या ‘रामपाल्स चायना एव्हरेस्ट फॅमेली रेस्टॉरंट’ मध्ये डिलीव्हरी बॉय म्हणुन काम करतो. रविवारी रेस्टॉरंटच्या शेजारच्या इमारतीमध्ये खाद्यपदार्थाच्या पार्सलची डिलीव्हरी देण्यासाठी तो गेला असता त्याने तिथे तरुणीसमोर अश्लील कृत्य केले. यावर तरुणीच्या कुटूंबियांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले.तर रेस्टॉरंटचे व्यवस्थापक नारायण भटारिया यांच्या सांगितले, ‘कन्हैय्यालाल हा समोरच्या चहाच्या टपरीवर काम करतो. गेले तीन ते चार दिवस तो आमच्याकडे काम मागण्यासाठी आला होता. परंतू नोकरी नसल्याचे आम्ही त्याला सांगितले. तरिही रविवारी पुन्हा त्याने काम देण्याची विनंती केली. त्यामुळे जवळच्या इमारतीमध्ये पार्सल पोहचविण्याचे आम्ही त्याला सांगितले. परंतू त्याने हा गैरप्रकार केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)