Join us

शहिदांचे बॅनर फाडणाऱ्यांविरोधात गुन्हा

By admin | Updated: October 12, 2016 05:06 IST

एकिकडे मुलुंडमध्ये पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या रावण दहनावरुन सेना - बीजेपीत राडा सुरु असतानाच भांडुपमध्ये मध्ये भाजपा वार्ड अध्यक्षाच्या भावाने

मुंबई : एकिकडे मुलुंडमध्ये पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या रावण दहनावरुन सेना - बीजेपीत राडा सुरु असतानाच भांडुपमध्ये मध्ये भाजपा वार्ड अध्यक्षाच्या भावाने शहिदांचे बॅनर फाडल्याने नवा वाद सुरु झाला आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात दोन इसमांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप पश्चिमेकडील टॅक रोड भागात राजू रिडलान (३६) हे राहण्यास आहे. ते शहिद भगतसिंग युवा संघचे अध्यक्ष आहेत. मंगळवारी वाल्मिकी जयंती निमित्ताने त्यांनी या विभागात शहिदांना श्रद्धांजलीचे बॅनर लावले होते. अशात स्थानिक कृष्णा गंगाराम बागडी (४८), राजेश कवरसिंग बिडलांग (५०) यांनी हे शहिदांचे बॅनर फाडले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यादरम्यान राजू यांनी त्यांना जाब विचारला असता, बागडीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अशात स्थानिक आणि पदाधिकारी यांच्या दुसरे वाद सुरु झाला. बागडी हा भांडुप भाजपा वॉर्ड अध्यक्ष राजपाल बागडी यांचा भाऊ आहे. तक्रारदाराने याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच राजपाल बागडी आणि भाजपाचे मंगेश पवार यांनी भांडुप पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलिसांनी भांडुप पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली. राजपाल बागडी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मुलुंडच्या सेना- भाजप प्रकरणात व्यस्त असल्याचे कारण देत, ते प्रकरण एवढे महत्त्वाचे नसल्याचे सांगितले. तर मंगेश पवार यांनीही तेच कारण देत नंतर बोलूयात असे सांगितले. मात्र या नव्या वादामुळे भांडुपमधील विरोधी पक्ष नेत्यांनी आरोपांच्या टिका झाडण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)