मुंबई : विधानसभा निवडणुकीचा फटका मुंबई विद्यापीठाच्या ऑक्टोबर परीक्षांना बसला आहे. निवडणूक कार्यक्रमामुळे तृतीय वर्षाच्या बीए, बीकॉम आणि बीएससी या प्रमुख अभ्यासक्रमांच्या ऑक्टोबरमध्ये होणा:या परीक्षा 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येईल.
निवडणुकीमुळे विद्यापीठाच्या ऑक्टोबर परीक्षांचे वेळापत्रक बिघडल्याने सुधारित वेळापत्रक ठरविण्यासाठी शुक्रवारी परीक्षा मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत टीवायबीए, टीवायबीकॉम, टीवायबीएससी या प्रमुख अभ्यासक्रमांच्या परीक्षा 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर कमी विद्यार्थी संख्या असलेल्या परीक्षा ऑक्टोबरमध्येच घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
विद्यापीठ आणि महाविद्यालयातील कर्मचा:यांना निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. या कामामध्ये कोणताही व्यत्यय येऊन विद्याथ्र्याची गैरसोय होऊ नये, यासाठी परीक्षा मंडळाने प्रमुख परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरे शैक्षणिक
सत्र 3 नोव्हेंबर ते 30 एप्रिल
2015 र्पयत करण्याबाबतची
शिफारस विद्यापीठाच्या विद्वत परिषदेकडे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
च्परीक्षा मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत टीवायबीए, टीवायबीकॉम, टीवायबीएससी या प्रमुख अभ्यासक्रमांच्या परीक्षा 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.