ठाणे-घोडबंदर रोड, कासारवडवली परिसरातील पाखंडा गावात जोगींदर रजक यांनी अनधिकृत बांधकाम केले होते. त्या बांधकामांवर गुरुवारी महापालिकेचे अतिक्रमण पथक कारवाई करीत असताना माजी नगरसेविका वनीता गोतपगार आणि अन्य एका महिलेने अडथळा आणून पथकाला शिवीगाळ करीत दमदाटी केली. त्या दोघींविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी महापालिकेच्या माजीवडा मानपाडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्या पसार महिलांचा शोध सुरु असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
महापालिकेच्या कारवाईत अडथळा; माजी नगरसेविकेसह दोघींवर गुन्हा
By admin | Updated: May 9, 2014 22:34 IST