Join us  

मुंबईच्या सौंदर्यात आणतेय बाधा; प्लास्टीकवरील कारवाईत सातत्य आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 12:53 AM

मे, २०२० पर्यंत राज्य प्लास्टीकमुक्त करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे़ यामुळे महापालिकेच्या कारवाईने पुन्हा एकदा वेग घेतला आहे.

शेफाली परब - पंडित

मुंबई : नाल्यांचे तोंड दाबून मुंबईला पुराचा तडाखा देणाऱ्या सन २००५ मधील अतिवृष्टीत प्लास्टीकरूपी भस्मासुराचा धोका दिसून आला होता़ भरतीच्या लाटांबरोबर समुद्र किनाºयावर येऊन धडकणाºया प्लास्टीकचा खच मुंबईच्या सौंदर्यात बाधा आणत आहे़ त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचविणाºया प्लास्टीकला हद्दपार करण्यासाठी महापालिकेने पावलं उचलली खरी़ मात्र, प्लास्टीकचे उत्पादन आणि वापर सुरूच असल्याने कारवाईचे उद्दिष्ट असफल होताना दिसत आहे़

राज्य सरकारने २३ जून, २०१८ पासून प्लास्टीकविरोधी मोहीम उघडली़ त्यानुसार, महापालिकेनेही प्लास्टीकला मुंबईतून हद्दपार करण्याचा निर्धार केला़ मात्र, अशा प्रकारच्या कारवाईची ही पहिली वेळ नाही़ दहा वर्षांपूर्वी तत्कालीन महापौर श्रद्धा जाधव यांच्या कार्यकाळात महापालिकेने प्लास्टीकमुक्त मुंबईसाठी प्रयत्न सुरू केले होते़ यासाठी प्लास्टीकमुक्त शहर म्हणून ओळखल्या जाणाºया हिमाचल प्रदेशचाही अभ्यास केला गेला़ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हिमाचल प्रदेशाचा दौरा करून अहवालही सादर केला होता़ मात्र, त्यानंतर प्लास्टीकमुक्तची मोहीम थंडावली़ त्यामुळे २००९ पासून आतापर्यंत प्लास्टीकने संपूर्ण बाजारपेठ काबीज केली आहे़ परिणामी, प्लास्टीकची सवय झालेल्या मुंबईकरांना त्याचा पर्याय शोधणे अवघड जात आहे़

राज्य सरकारनेच प्लास्टीकच्या वस्तू, थर्माकोल वस्तुंच्या वापरावर बंदी आणल्यानंतर या मोहिमेने पुन्हा एकदा वेग घेतला़ सहा महिन्यांच्या कालावधीत सर्व दुकाने, बाजारपेठा, आस्थापनांवरील कारवाई आणि जनजागृतीने प्लास्टीकच्या दुष्परिणामांविषयी लोकांना सतर्क केले़ प्लास्टीकचा वापर टाळण्याची मानसिकता लोकांमध्ये हळूहळू रुजू लागली़, परंतु गेल्या वर्षी निवडणुकीच्या काळात प्लास्टीकवरील कारवाई थंडावली आणि पुन्हा बाजारपेठेत प्लास्टीकच्या पिशव्या डोकावू लागल्या़ मधल्या काळात कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर सुरू झाला होता़ त्या जागी पुन्हा प्लास्टीक पिशव्या दिसू लागल्या़ कारवाई करणारे पालिकेचे पथकही या काळात दिसेनासे झाले़ त्यामुळे या मोहिमेचे उद्दिष्टच निष्फळ ठरले़

मे, २०२० पर्यंत राज्य प्लास्टीकमुक्त करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे़ यामुळे महापालिकेच्या कारवाईने पुन्हा एकदा वेग घेतला आहे़ दररोज दुकाने आणि आस्थापनांची झाडाझडती घेऊन प्रतिबंधित प्लास्टीक वापरणाºयांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे़ आठवड्याभरात पालिकेने तब्बल २५ लाख रुपये दंड वसूल केला आहे़ मात्र, अशा कारवाईतून दंड वसूल करणे ऐवढेच उद्दिष्ट न ठेवता लोकांना प्लास्टीकचा वापर करण्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे़ त्यासाठी या कारवाईमध्ये सातत्य असणे आवश्यक आहे, तसेच केवळ दुकाने आणि आस्थापनांवर कारवाई मर्यादित न ठेवता प्लास्टीकचे उत्पादन, विक्री आणि वापरावरही निर्बंध आणणे अपेक्षित आहे, तरच मुंबई प्लास्टीकमुक्त करण्याचे स्वप्न साकार होईल़प्लास्टीकवरील कारवाईचा तपशील (२३ जून, २०१८ पासून आतापर्यंत)झाडाझडती - १६ लाख ३२४ आस्थापनाप्रतिबंधित प्लास्टीक जप्त - ८५ हजार ८४० किलोग्रॅमदंड - चार कोटी ६४ लाख ३० हजार रुपये पालिकेकडून कचºयाचे डबे पुरविणे, जमा झालेल्या प्लास्टीकची विल्हेवाट लावणे, आठवड्यातून एक दिवस विभाग कार्यालयात प्लास्टीक संकलित करण्याची व्यवस्था लावणे, जनजागृती करणे.विविध सेवाभावी संस्थांची मदत घेणे, सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेले प्लास्टीक त्वरित उचलणे हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

टॅग्स :प्लॅस्टिक बंदीमुंबई महानगरपालिका