मुंबई : अंधेरीतील महिला डॉक्टरला अश्लील फोटो आणि एसएमएस पाठविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. ओशिवरा पोलिसांनी बुधवारी या प्रकरणातील आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केली.गेल्या वर्षी उपचारांच्या बहाण्याने आरोपी त्वचारोगतज्ज्ञ असलेल्या या महिला डॉक्टरला भेटला. त्यानंतर एप्रिल, २०१९ ते जुलै, २०२९ दरम्यान ओशिवरामधील त्यांच्या क्लिनिकमध्ये तो त्यांना सतत फोन करून त्रास देऊ लागला. तसेच त्यांच्या मोबाइलवर त्याने अश्लील फोटो, व्हिडीओ आणि मेसेजेस पाठविण्यास सुरुवात केली. अखेर कंटाळून डॉक्टरने त्याचा नंबरच ब्लॉक केला. तसेच याप्रकरणी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तपासादरम्यान आरोपी हा उत्तर प्रदेशमधील उन्नावचा राहणारा असल्याचे समजले. त्यानुसार ओशिवरा पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले.
डॉक्टरला अश्लील मेसेज; एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 23:53 IST