मुंबई : दिल्लीतील प्राणिसंग्रहालयात पांढऱ्या वाघाने पर्यटकावर हल्ला केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्लॅन्ट अॅण्ड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी या संघटनेने आरे कॉलनीतील प्रस्तावीत प्राणिसंग्रहालय प्रकल्पावर आक्षेप घेतला आहे़ वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या नूतनीकरणासाठी दीडशे कोटींची तरतूद केली आहे़ मात्र प्राणिमित्र संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे हा प्रकल्प लटकला आहे़ आता पॉज या संघटनेने आक्षेप घेतला आहे़ या प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्याऐवजी प्राण्यांच्या पुनर्वसनास केंद्र उभारण्याची मागणी या संघटनेने केली आहे़ पालिकेने विस्ताराच्या प्रकल्पावर चर्चा करण्यापूर्वी नागरिकांकडून सूचना व हरकतीही मागविलेल्या नाहीत, असे निदर्शनास आणले आहे़ मात्र असे कोणतेच पत्र अद्याप आपल्याला मिळाले नसल्याचे अतिरिक्त आयुक्त एस़व्ही़ आऱ श्रीनिवास यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
आरे कॉलनीतील प्राणिसंग्रहालयावर आक्षेप
By admin | Updated: September 25, 2014 01:32 IST