Join us

ओबामांची चर्चा व्हॉट्सअपवर

By admin | Updated: February 3, 2015 00:31 IST

प्रजासत्ताक दिनासाठी विशेष हजेरी लावणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गेल्या आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅपवर चर्चेचा विषय ठरले.

प्रजासत्ताक दिनासाठी विशेष हजेरी लावणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गेल्या आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅपवर चर्चेचा विषय ठरले. मग ‘बराक ओबामांच्या बायकोचा उखाणा -‘अमेरिकेची फर्स्ट लेडी मी लांब माझा फराक मोदींची ओटी भरते, नवरा माझा बराक’ या मेसेजने व्हॉट्सअ‍ॅपवर धमाल उडविली. याशिवाय ‘गंगा साफ करने के लिए कोई मंत्रालय की जरूरत नहीं, सिर्फ ओबामा को गंगास्नान के लिए निमंत्रण दे, बाकी काम अमेरिका कर देगा,’ अशा आशयाचे मेसेजेही व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होते. ‘ओबामा पुन्हा भारतात येण्याची शक्यता... मोदींच्या घरी राहिला बारीक पिनचा चार्जर’ या मेसेजने तर व्हॉट्सअ‍ॅपवर एकच हशा पिकवला. तर पुणेकरांनी ‘दिल्ली विमानतळावर आगमन होताच ओबामांचे तत्काळ पुण्याला प्रयाण, एक वाजता चितळे बंधू बंद होण्याआधी बाकरवाडी घेण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज,’ या मेसेजने पुन्हा एकदा आपल्या ‘मिश्कील’ स्वभावाचा परिचय दिला. शिवाय ‘ओबामांनी भारतात पाऊल ठेवल्या ठेवल्या अ‍ॅडमिनला भेटण्याचे ठरविले आहे,’ अशा खुमासदार ओबामा भेटीच्या जोरदार गमतीजमती शेअर होत आहेत. आता ओबामा भारतातून परतून अमेरिकेत सेटल्डही झाले, मात्र व्हॉट्सअ‍ॅपवर अजूनही त्यांची चर्चा आहे.