Join us

नूतन ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेसह भाजपाचे राजकीय वर्चस्व सिध्द

By admin | Updated: October 22, 2014 22:56 IST

नागरिकरण झपाट्याने होत असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

सुरेश लोखंडे, ठाणेनागरिकरण झपाट्याने होत असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. विभाजनानंतरही देशात सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यावर लोकसभेप्रमाणेच या विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपाने सात तर शिवसेनेने सहा जागा जिंकून नव्या ठाणे जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व सिध्द केले आहे. नूतन ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या तीन जागांपैकी शिवसेनेचे दोन खासदार देऊन जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व सिध्द केले आहे. याशिवाय विधानसभेच्या या निवडणुकीत शिवसेनेचे सहा आमदार विजयी झाले आहे. यामुळे खासदारकीसह आमदारकी प्राप्त करून सेनेने जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व सिध्द केले आहे. याशिवाय ठाणे महापालिकेसह कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेची सत्ता प्राप्त करून सेनेने भाजपापेक्षा जिल्ह्यावरील राजकीय पकड घट्ट केली आहे. जिल्ह्यात सेनेचे दोन खासदार असले तरी भाजपाने काँग्रेसच्या ताब्यातील भिवंडी लोकसभा प्राप्त करण्यात यश मिळवले आहे. याशिवाय १८ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक सात जागी आमदार निवडणून आणले आहेत. याशिवाय सेनेबरोबर महापालिकांवर देखील भाजपाची सत्ता आहे. मुंबईला जवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असलेला भाजपा राज्याची सत्ता प्राप्त करून लोकांसमोर जाणार आहे. यामुळे राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत भाजपाव्दारे ठाणे जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली जाणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून या जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व सिध्द करण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. पण सर्वात जास्त आमदारकीच्या सात जागा प्राप्त करून जिल्ह्यावर राजकीय पकड घट्ट केली आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही शिवसेनेसह भाजपाचे जास्त सदस्य निवडणून आणण्याची रणनिती आधीच आखली गेली आहे. यामुळे मीनी मंत्रालय असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या सत्तेवर शिवसेना व भाजपाचा डोळ असल्याचे म्हणणे वावगे ठरणारे नाही. जिल्हा विभाजनामुळे बरखास्त झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेत सेनेचे १५ उमेदवारांसर्ह भाजपाचे ११ सदस्य सक्रीय होते. याप्रमाणेच आगामी निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांचे सदस्य सर्वाधिक निवडून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.