Join us
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीमुळे आत्महत्या नाहीत!

By admin | Updated: June 6, 2015 02:17 IST

मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य शेतकरी आत्महत्या नापिकीमुळे नव्हे, तर व्यसनाधिनता, हुंडा, घरगुती भांडणे अशा कारणांस्तव झाल्याचा धक्कादायक असा प्राथमिक अहवाल क्षत्रिय यांना शुक्रवारी सादर केला.

मुंबई : मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य शेतकरी आत्महत्या नापिकीमुळे नव्हे, तर व्यसनाधिनता, हुंडा, घरगुती भांडणे अशा कारणांस्तव झाल्याचा धक्कादायक असा प्राथमिक अहवाल विविध खात्यांच्या ११ प्रधान सचिवांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना शुक्रवारी सादर केला.शेतकरी आत्महत्यांचा अभ्यास करण्यासाठी सरकारने मराठवाड्यातील उस्मानाबाद व विदर्भातील यवतमाळ या दोन सर्वाधिक आत्महत्या असलेल्या जिल्ह्यांकरिता ११ प्रधान सचिवांची नियुक्ती केली होती. प्रत्येकी एक याप्रमाणे तालुका वाटून दिला होता. या प्रधान सचिवांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन माहिती गोळा केली. त्यानंतर त्यांनी आपला प्राथमिक अहवाल प्रधान सचिव क्षत्रिय यांना सादर केला. त्यामध्ये शेतीच्या कारणास्तव होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण अत्यल्प असून, अन्य कारणास्तव आत्महत्या होत असल्याचे मत बहुतांश प्रधान सचिवांनी व्यक्त केले आहे.आत्महत्या रोखण्याकरिता पोलीस पाटील हा महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. त्या दृष्टीने अधिक जबाबदारी देण्याची सूचना करण्यात आली. मागील सरकारने अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. (विशेष प्रतिनिधी)च्राज्यात एकेकाळी सामूहिक विवाह मोठ्या प्रमाणावर होत होते. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण कमी झाले आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठे विवाह सोहळे करण्यावर भर राहिला आहे. अशा विवाहाकरिता अडीच ते तीन लाख रुपये खर्च सहज होतो. हे टाळण्याकरिता सामाजिक न्याय विभागाने लग्नसराईच्या काळात या भागात सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करावे जेणेकरून अनेक घरांतील विवाह स्वस्तात होतील व लग्नातील खर्च व हुंडा यामुळे होणाऱ्या आत्महत्या कमी होतील.