Join us  

शहरातील हॉटस्पॉटची संख्या आली निम्यावर, हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन राहणार ३० सप्टेंबरपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 3:05 PM

महापालिका प्रशासन, डॉक्टर, नर्सेस तसेच राजकीय मंडळींनी केलेल्या कामगिरीमुळे शहरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या कमी होतांना दिसत आहे. त्यामुळे आता शहरातील हॉटस्पॉटची संख्या देखील कमी झाली आहे. जुलै महिन्याच्या अखेर पर्यंत शहरात ३९ हॉटस्पॉट होते. आता मात्र ती संख्या १५ वर आली आहे.

ठाणे : शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या कमी होत असतांना शहरातील आता हॉटस्पॉटची संख्या देखील निम्यावर आली आहे. पालिकेने नव्याने केलेल्या सर्व्हेत शहरात आता केवळ १५ हॉटस्पॉट शिल्लक राहिले असून हॉटस्पॉटची संख्या २४ ने कमी झाली आहे. त्यामुळे नव्या १५ हॉटस्पॉटच्या ठिकाणी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लॉकडाऊन कायम असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान बुधवार पासून शहरातील मॉलही सुरु झाले असून या ठिकाणी सोशल डिस्टेसींग, येणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटायझ करणे अशा प्रकारे नियमांचे योग्य ते पालन केले जात आहे.

              शहरातील सिनेमागृह, मॉलमधील सिनेमागृह, व्यायामशाळा मंनोरजन उद्यााने, तरण तलाव, बार, नाट्यगृह आणि सभागृह बंद ठेवण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २ ते १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने टाळेबंदी शिथिल करत सर्वच बाजारपेठा आणि दुकाने सुरु केली होती. तर २७ प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जाहीर करून येथे टाळेबंदी कायम ठेवली होती. ३१ जुलैला लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर प्रशासनाने पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून ३९ प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जाहीर करत याठिकाणी ३१ आॅगस्टपर्यंत लॉकडाऊन लागू केला. ही मुदत संपुष्टात आल्यामुळे प्रशासनाने हॉटस्पॉट क्षेत्रांसाठी नवे आदेश काढले आहेत. त्यामध्ये शहरातील १५ हॉटस्पॉट क्षेत्रांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील मनीषानगर रस्ता ते मुंबई-पुणे मार्ग आणि जानकीबाई रामा साळवी रस्ता ते मनिषानगर गेट क्र मांक ३, मुंबई-पुणे मार्ग ते कुंभार लेन - चेऊलकर मार्ग आणि बँक आॅफ बडोदा ते सुन्नी शफी जामा मश्जीद, शिवाजीनगर मार्केट रस्ता ते शिवाजी तलाव आणि रेल्वे रु ळ, भुसारआळीतील जय धनश्री सोसायटी ते चिंचपाडा रस्ता आणि जैनमंदीर ते अब्दुल हमिद रस्ता, विटाव्यातील भंडारपाडा रस्ता ते ऐरोली नॉलेज पार्क आणि ठाणे बेलापूर मार्ग ते न्यु सुर्यानगर रस्ता, वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रातील किसननगर एक मधील नेपच्युन एलिमेंट वाणज्यि इमारत ते मुंबईची हद्द व रस्ता क्र मांक १६ ते आश्रम रस्ता, रस्ता क्र ंमाक ३ ते शांताराम चव्हाण रस्ता व सेंट लॉरेन्स डिसोजा रस्ता ते बापुराव पाटील मार्ग, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील रु स्तमजी गृह संकुलातील अ‍ॅक्युरा आणि अझिनो इमारत, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील शिवाईनगरमधील उपवन खेळाचे मैदान ते सिंधू सोसायटी व देवदया नगर ते प्रमिला औद्याागिक वसाहत, लोकमान्य-सावरकर प्रभाग समिती क्षेत्रातील दोस्ती रेंटल इमारती, माजिवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील मरीआई नगर, हायलँड रेसीडेन्सी फेज-१, पिरामल लेबर कॅम्प आणि यशस्वीनगर या भागांचा समावेश आहे.मागील महिनाभरात शहरातील करोना बाधीत रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यानुसार आता शहरातील हॉटस्पॉट संख्या देखील आता निम्यावर आली आहे. दुसरीकडे शहरातील मॉल आणि व्याापरी संकुले देखील सुर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्याठिकाणी नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या सुचनाही पालिकेने दिल्या आहेत. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकाकोरोना वायरस बातम्या