Join us  

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३० हजार पार, एकाच दिवसात १६०६ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 10:24 PM

सध्याची वाढती संख्या पाहता राज्यात मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. मुंबईला तत्काळ बेड मिळायला हवेत. जूनपर्यंतचा डबलिंग रेट पाहता मुंबईमध्ये लाखभर

मुंबई - महाराष्ट्रामध्ये गुरुवारी नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा १६०० पार गेलेला होता. तर, शुक्रवारी या आकड्यांमध्ये किंचितसाच फरक पडलेला पाहायला मिळाला. त्यानंतर, शनिवारीही १६०६ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राने ३० हजार रुग्णांचा टप्पा पार केला असून आत्तापर्यंतची एकूण रुग्णसंख्या ३०७०६ एवढी झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.   

सध्याची वाढती संख्या पाहता राज्यात मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. मुंबईला तत्काळ बेड मिळायला हवेत. जूनपर्यंतचा डबलिंग रेट पाहता मुंबईमध्ये लाखभर पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यासाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १५,००० मध्यम बाधित रुग्ण आणि १००० आयसीयु बेडची व्यवस्था करण्य़ात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच तीस हजार जागांवर येत्या दीड महिन्यात भरती करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. 

राज्यात शुक्रवारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसभरात १५७६ एवढी होती, तर ४९ मृत्यू झाले आहेत. त्यानंतर, आज शनिवारी १६०६ नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ३०७०६ पर्यंत पोहोचली आहे. आज ५२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर, २२४७९ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईराजेश टोपे