Join us

पोलीसपुत्राकडून प्रेयसीचे नग्न फोटो व्हायरल

By admin | Updated: April 19, 2017 01:09 IST

बनावट फेसबुक खाते तयार करून त्यावरून पोलीसपुत्राने नग्न फोटो व्हायरल केल्याची तक्रार त्याच्या २० वर्षीय प्रेयसीने केली आहे.

मुंबई : बनावट फेसबुक खाते तयार करून त्यावरून पोलीसपुत्राने नग्न फोटो व्हायरल केल्याची तक्रार त्याच्या २० वर्षीय प्रेयसीने केली आहे.भांडुप परिसरात तक्रारदार तरुणी कुटुंबीयांसह राहते. ती बारावीची विद्यार्थिनी असून तिचे त्याच परिसरातील एका अभियंता तरुणाशी प्रेमसंबंध होते. तरुणाचे वडील मुंबई पोलीस दलात निरीक्षकपदावर आहेत. तरुणाचे अन्य एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याने कळल्यानंतर त्याच्यासोबत बोलणे सोडले. यातूनच त्याने मित्राचे बनावट फेसबुक खाते बनवून आपले नग्न फोटो व्हायरल करून बदनामी केली. तसेच पोलिसाचा मुलगा असल्यामुळे आपल्यावर कोणीही कारवाई करू शकणार नाही, अशा धमक्याही तो देत असल्याची तक्रार संबंधित तरुणीने भांडुप पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी हा तक्रार अर्ज पुढे तपासासाठी सायबर पोलिसांना दिला आहे. याप्रकरणी दोघांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यात मुलाने दिलेल्या जबाबात मुलीचे अन्य मुलाशी प्रेमसंबंध असल्याने लग्नास नकार दिल्याचे त्याने सांगितले. तसेच आपण कुठलेही बनावट फेसबुक खाते उघडले नसल्याचेही त्याने सांगितले. (प्रतिनिधी)