Join us
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसी कंपनीत चोरट्यांची घुसखोरी सुरूच

By admin | Updated: June 15, 2015 23:19 IST

एनआरसी कंपनीत चोरांची घुसखोरी सुरूच आहे. भंगारचोरीसाठी घुसलेल्या लक्ष्मण भंडारी या चोरट्याचा सुरक्षा रक्षकांच्या मारहाणीत

कल्याण : एनआरसी कंपनीत चोरांची घुसखोरी सुरूच आहे. भंगारचोरीसाठी घुसलेल्या लक्ष्मण भंडारी या चोरट्याचा सुरक्षा रक्षकांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी मध्यरात्री कंपनीच्या आवारात घुसलेल्या चोरट्यांनी सुरक्षारक्षकांवर दगडफेक केल्याची घटना घडली. या वेळी त्यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार करताच चोरट्यांनी धूम ठोकली.२००९ पासून ही कंपनी बंद आहे. त्यामुळे तेथील भंगार चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. ३ जूनला अशाच प्रकारे चोरीच्या उद्देशाने कंपनीच्या आवारात घुसलेल्या भंडारी नामक चोरट्याचा सुरक्षारक्षकांच्या मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून शिवप्रसाद पांडे, अमर देसले आणि रामप्रसाद सिंग यांना अटक केली.कंपनीत चोरट्यांची घुसखोरी सुरूच असून बुधवारी ४ ते ५ चोरट्यांनी बंद ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या पट्ट्या आणि ट्रान्सफॉर्मरमधील आॅइल चोरण्याचा प्रयत्न केला. चोरांची चाहूल लागताच सुरक्षारक्षकांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. त्या वेळी त्यांनी दगडफेक केल्याने स्वसंरक्षणार्थ गोपाळसिंग रावत या सुरक्षारक्षकाने बंदुकीतून हवेत गोळी झाडली. गोळीबाराच्या भीतीने चोरट्यांनी चोरलेला माल तेथेच टाकून पोबारा केला. (प्रतिनिधी)