Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे आता ‘ते’ दिवस सुसह्य होतील !

By admin | Updated: April 20, 2017 11:34 IST

स्त्रीत्वाचा अविभाज्य घटक म्हणजे मासिक धर्म होय. शाळेत शिकताना, उमलत्या वयात जेव्हा पाळी येणे ही एक प्रत्येक महिन्यातली डोकेदुखीच बनून जाते.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 20 -  स्त्रीत्वाचा अविभाज्य घटक म्हणजे मासिक धर्म होय. शाळेत शिकताना, उमलत्या वयात जेव्हा पाळी येणे ही एक प्रत्येक महिन्यातली डोकेदुखीच बनून जाते. एकदा पाळी आली कि ती पुढच्या महिन्यात नियमित वेळेला येईलच असे नाही. त्यामुळे कित्तेक जणींकडे सॅनिटरी पॅडही नसते. त्यातही प्रत्येकीने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणेही तितकेच महत्वाचे असते. हीच बाब हेरून वर्सोवा येथील आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी एक मोलाचे पाऊल उचलले आहे.                                     
महिला आमदार असतील तर महिलांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो.या गहन विषयावर त्यांनी सातत्याने विधानसभेत आवाज उठवला होता.आणि खास बाब म्हणून त्यांची ही संकल्पना यशस्वीपणे राबवण्यासाठी विशेष बाब म्हणून राज्य सरकारकडून या योजनेला मंजुरी मिळवून घेतली.याकामी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोलाचे सहकार्य केले.वर्सोवा मतदार संघातील शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल,मेट्रो स्टेशन, झोपडपट्टी,पोलिस ठाणे,मतदारसंघातील महापालिका कार्या लय,गृहनिर्माण संस्था आणि अन्य महत्वाच्या ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी दिली.
वर्सोवा, यारी रोड येथील चिल्ड्रेन वेल्फेर सेन्टर हाय स्कूल  आणि क्लारा कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये  ऑटोमॅटिक सॅनिटरी पॅड एटीएम आणि डिस्पोजल मशीन बसवायचा निर्णय घेतला आहे.                   उद्या शुक्रवार दि,२१ एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे, जेष्ठ पत्रकार राही भिडे,मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड, लिलावती हॉस्पिटल आणि रीसर्च सेंटरच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा अगरवाल, संगीत दिग्दर्शिका कामिनी खन्ना, साकेत हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुचेता दिघे,प्राचार्य अजय कौल या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत
"डॉटर्स ऑफ वर्सोवा" नामक या मोहिमेसाठी कॉम्फी पॅड्स, "ती" फाऊंडेशन यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. या अभियानांतर्गत ज्या ठिकाणी महिलांची संख्या लक्षणीय आहे अशा सार्वजनिक ठिकाणी या मध्ये ऑटोमॅटिक सॅनिटरी पॅड व्हेंडिंग एटीएम मशीन्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महिलांना प्रिपेड स्मार्ट कार्ड दिले जाणार असून त्याचा वापर नॅपकिन व्हेंडिंग मशीन्स मधून काढण्यासाठी केला जाणार आहे. त्याच बरोबर सॅनिटरी पॅड्स ची विल्हेवाट हीसुद्धा गंभीर आरोग्य विषयक समस्या बनली आहे त्यावर तोडगा म्हणून नॅपकिन डिस्पोझल मशीन्ससुद्धा बसवण्यात येतील अशी माहिती आमदार डॉ.लव्हेकर यांनी दिली.