Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता वैद्यकीय विम्याचे काय ?

By admin | Updated: December 25, 2014 00:04 IST

पालिकेच्या १ हजार ५५६ कर्मचा-यांच्या वैद्यकीय विम्याची मुदत ११ नोव्हेंबरला संपुष्टात येऊनही त्यावर प्रशासनाने दिरंगाई

राजू काळे, भार्इंदरपालिकेच्या १ हजार ५५६ कर्मचा-यांच्या वैद्यकीय विम्याची मुदत ११ नोव्हेंबरला संपुष्टात येऊनही त्यावर प्रशासनाने दिरंगाई चालविली असून तब्बल सहा महिन्यांनी अग्निशमन दलातील ८२ कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा उतरविला आता त्याना वैद्यकीय विमा सुविधा केव्हा मिळणार, असा सवाल कर्मचारी संघटनेने प्रशासनाला विचारलाआहेपालिकेकडून कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाला चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने वैद्यकीय विम्याची तजवीज करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाय््रााला सुमारे २ लाखांचा वैद्यकीय विमा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. गतवर्षी ही योजना मे. विपुल मेडीकॉर्प या खाजगी कंपनीमार्फत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. या निमशासकीय विमा कंपनीद्वारे उपलब्ध करुन दिली होती. त्यावेळी कर्मचाय््राांच्या वैद्यकीय दाव्यांना निकाली काढण्यासाठी कंपनीने मे. विपुल मेडीकॉर्प या टिपीए (थर्ड पार्टी अ‍ॅथोरिटी) म्हणून नियुक्त केले होते. परंतु, या टिपीए मार्फत निकाली काढण्यात आलेले वैद्यकीय दावे व देण्यात येणारी सेवा असमाधानकारक असल्याचा कर्मचारी संघटनेने आरोप केला आहे. यंदाच्या वैद्यकीय विम्याची मुदत ११ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आल्यानंतरही प्रशासन त्यावर गंभीर नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.