Join us  

मुंबईत आता व्हर्टिकल गार्डन, गोरेगावात प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 7:07 AM

गोरेगाव (पश्चिम) रेल्वे स्टेशनपासून पालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभाग कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या ‘स्कायवॉक’च्या पाच खांबांवर सात हजार ४७६ रोपटी ‘व्हर्टिकल’ पद्धतीने लावण्यात आली आहेत.मुंबईतील हरित पट्टा वाढविण्यासाठी महापा

मुंबई :  गोरेगाव (पश्चिम) रेल्वे स्टेशनपासून पालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभाग कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या ‘स्कायवॉक’च्या पाच खांबांवर सात हजार ४७६ रोपटी ‘व्हर्टिकल’ पद्धतीने लावण्यात आली आहेत.मुंबईतील हरित पट्टा वाढविण्यासाठी महापालिकेच्या उद्यानांमध्ये, रस्त्यांच्या कडेलाझाडे लावण्यात येत असतात. याअंतर्गत महापालिकेच्या उद्यान विभागाने प्रायोगिक स्तरावर ‘व्हर्टिकल गार्डन’ उभारण्यास सुरुवात केली आहे. दुबई, सिडनी, सिंगापूर, तैपई (चीन), बोगोटा (कोलंबिया) यांसारख्या जगातील अनेक मोठ्या शहरांमधील ‘व्हर्टिकल गार्डन’ प्रसिद्ध आहेत.मुंबईत इतर परिसरांमध्येही असे उद्यान उभारण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. या उद्यानातील रोपट्यांना दिवसातून दोनवेळा ‘ड्रीप एरिगेशन’ पद्धतीने पाणी देण्यात येत आहे. या उद्यानाच्या देखभालीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. महिन्याभराच्या कालावधीत उभारण्यात आलेल्या या उद्यानासाठी महापालिकेला सुमारे १५ लाख रुपये खर्च आला आहे.-सुमारे साडेसात हजार रोपटी लावण्यासाठी ‘स्कायवॉक’च्या खांबांवर विशेष व्यवस्था करून कुंड्या लावण्यात आल्या आहेत. या कुंड्यांमध्ये रोपटीदेखील वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनेच लावण्यात आली आहेत.- या कुंड्यांचे वजन तुलनेने कमी असणे आवश्यक असल्याने कुंड्यांमध्ये केवळ मातीऐवजी कोकोपीट, पीटमॉस, लाकडी कोळसा, झाडांच्या पानांचा भुगा, जैविक खत इत्यादी बाबी वापरण्यात आल्या आहेत.-हिरव्या व तांबड्या पानांची झाडे ‘व्हर्टिकल’ धुरे तयार करून ही रोपटी लावण्यात आली आहेत. या रोपट्यांमध्ये सिंगोनियम, मनी प्लांट, स्पिंग्री या तीन प्रकारच्या झाडांची प्रत्येकी एक हजार ६८० रोपटी लावण्यात आली आहेत.- पेन्डॅनस व सिक्रेशिया या प्रजातींची अनुक्रमे ९२४ व १ हजार ५१२ एवढी रोपटी लावण्यात आली आहेत.

टॅग्स :घरबातम्या