Join us  

आता मुंबई विद्यापीठाने घातला अर्जाचा गोंधळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 6:14 AM

आॅनलाइन निकाल गोंधळाने वाद ओढवून घेतलेल्या मुंबई विद्यापीठाने आता विद्यार्थ्यांच्या अर्जाचा नवीन गोंधळ घातला आहे़ परीक्षेला हजर होतो, अशी लेखी हमी विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून घेतली़ मात्र निकाल काही लावले नाहीत़

मुंबई : आॅनलाइन निकाल गोंधळाने वाद ओढवून घेतलेल्या मुंबई विद्यापीठाने आता विद्यार्थ्यांच्या अर्जाचा नवीन गोंधळ घातला आहे़ परीक्षेला हजर होतो, अशी लेखी हमी विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून घेतली़ मात्र निकाल काही लावले नाहीत़ विद्यार्थ्यांनी निकालासाठी तगादा लावल्यानंतर विद्यापीठाने हे हमी अर्ज शोधण्याचे काम विद्यार्थ्यांनाच दिले आहे़ त्यामुळे शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी अवघे तीन महिने उरले असतानाच विद्यार्थ्यांचे हाल काही संपत नसल्याचे चित्र आहे़आॅनलाइन निकालाचा फज्जा उडाल्यानंतर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षेला हजर असल्याची हमी द्यायला सांगितली़ त्यानुसार काही विद्यार्थ्यांनी स्वत: ही लेखी हमी दिली़ परीक्षेसाठी कोणते परीक्षा केंद्र होते़ किती तारखेला पेपर होता, याचा तपशील या हमीमध्ये होता़ काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयाकडून ही हमी लिहून आणली़ ही हमी दिल्यानंतर अपेक्षित वेळेत निकाल न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे निकालासाठी विचारणा केली़ विद्यापीठाने नवील शक्कल लढवत विद्यार्थ्यांनाच त्यांनी दिलेले हमी अर्ज शोधण्यास सांगितले़ यासाठी विद्यार्थ्यांसमोर अर्जांचा गठ्ठा ठेवला़गठ्ठ्यातून स्वत: अर्ज विद्यार्थ्याने शोधून द्यायचा़ अर्ज शोधून दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याला किमान २० दिवसांत निकाल दिला जाईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात येते़ ज्यांना अर्ज सापडत नाही, त्यांना पुन्हा नव्याने हे अर्ज देण्यास सांगितले जाते़ विद्यापीठाच्या या कारभाराचा नाहक त्रास होत आहे़ कारण अर्ज सापडला तरी प्रत्यक्ष निकाल हातात येण्यासाठी डिसेंबर महिन्याची वाट बघावी लागणार आहे़ याविषयी निकालाच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी पुढे येऊन बोलणे टाळत आहेत, तर विद्यापीठाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही़

टॅग्स :विद्यार्थीमुंबई विद्यापीठ