मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून टाटा पॉवरला पुढील 25 वर्षासाठी मुंबई शहरात वीजपुरवठा करण्यास दिलेला परवाना रद्द करण्यात यावा, यासाठी बेस्टने केलेली याचिका केंद्रीय वीज लवादाने फेटाळली. त्यामुळे टाटा पॉवरचा मुंबईसह शहरातील वीजपुरवठय़ाचा मार्ग मोकळा झाला.
टाटा पॉवर कंपनीला 1916 साली शंभर वर्षासाठी मुंबईत वीज वितरणाचा परवाना मंजूर करण्यात आला होता. परंतु 2क्क्3च्या कायद्यानुसार वीज वितरण परवान्याचे नूतनीकरण करणो बंधनकारक होते आणि 15 ऑगस्ट 2क्14 रोजी टाटाचा मुंबईतील वीज वितरणाचा परवाना संपत होता. कंपनीने आयोगाकडे परवान्याचा अर्ज केला. या स्पर्धेत महावितरणसारखी तगडी कंपनीही सहभागी होती. 15 ऑगस्ट रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रत पुढील 25 वर्षे वीज वितरण करण्यासाठीचा परवाना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने टाटा पॉवर वीज कंपनीला मंजूर केला होता. त्याविरोधात बेस्ट प्रशासनाने केंद्रीय वीज लवादाकडे न्याय मागितला. बेस्टची ही याचिका लवादाने फेटाळली.
15 ऑगस्ट रोजी राज्य
वीज नियामक आयोगाने टाटाला दिलेला वीज वितरणाचा परवाना 16 ऑगस्ट 2क्14 पासून 15 ऑगस्ट 2क्39 र्पयत लागू राहणार आहे.
कुठे-कुठे करता येणार वीजपुरवठा?
टाटाला शहरातील कुलाब्यापासून माहीमर्पयत, पश्चिम उपनगरांतील वांद्रय़ापासून दहिसर्पयत, पूर्व उपनगरांत चुनाभट्टीपासून विक्रोळी आणि मानखुर्दर्पयतच्या ग्राहकांना वीज वितरित करता येणार आहे. शिवाय मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रतील ग्राहकांना वीज वितरित करता येणार आहे.