Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता एम-इंडिकेटरवरूनही महिला प्रवाशांची सुरक्षा

By admin | Updated: January 8, 2015 00:54 IST

महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर रेल्वे पोलिसांकडून (आरपीएफ-रेल्वे सुरक्षा दल) खास लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर रेल्वे पोलिसांकडून (आरपीएफ-रेल्वे सुरक्षा दल) खास लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आता एम-इंडिकेटरव्दारेही महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर भर देण्याचा निर्णय झाला झाली आहे. या सेवेचे अधिकृतरित्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ९ जानेवारी रोजी उद्घाटन होईल.महिला प्रवाशांवरील गुन्ह्यात गेल्या काही वर्षात सातत्याने वाढत होत आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रात्रीच्या प्रवासात महिला प्रवाशांच्या डब्यात सुरक्षा पुरविण्यात आली आहे. तर पश्चिम रेल्वेकडून १३११ आणि मध्य रेल्वेकडून १२७५ हे हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहेत. मात्र महिला सुरक्षेवर अधिक भर देताना सर्वांना परिचित आणि अधिक वापर होणाऱ्या एम-इंडिकेटरवरही हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आणि त्यानुसार ही सेवा आरपीएफकडून सुरु करण्यात आली. एम-इंडिकेटरवर पश्चिम आणि मध्य रेल्वेचा हेल्पलाईन नंबर देण्यात आला असून यात आपात्कालिन परिस्थीतीसाठी एसएमएस सेवाही उपलब्ध करण्यात आली आहे. एखादी आपात्कालिन परिस्थीती उद्भवल्यास नातेवाईकांनाही एसएमएस जावा आणि त्यांनाही संपर्क साधता येण्यासाठी यात दोन नातेवाईकांचे नंबर उपलब्ध करुन देण्याची सोयही करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिने महिला प्रवाशांनी कोणती काळजी घ्यावी याची माहीतीही देण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)