Join us

आता खेळी ‘जुगाडाची’

By admin | Updated: October 17, 2014 22:51 IST

मतदान होईर्पयत स्वबळावर सत्ता मिळवू, अशा डरकाळ्या फोडणारे सर्वच राजकीय पक्ष मतदानानंतरच्या एक्ङिाट पोलचे आणि ओपिनियन पोलचे निष्कर्ष पाहून जमिनीवर आले आहेत.

ठाणो / वसई - पालघर  : मतदान होईर्पयत स्वबळावर सत्ता मिळवू, अशा डरकाळ्या फोडणारे सर्वच राजकीय पक्ष मतदानानंतरच्या एक्ङिाट पोलचे आणि ओपिनियन पोलचे निष्कर्ष पाहून जमिनीवर आले आहेत. जर युती अथवा आघाडी करायची वेळ आली तर  कुणाशी कशी सत्तासोयरीक जुळवायची किंवा आपल्यावर जर कुणाला सहकार्य करण्याची वेळ आली तर आपली भूमिका काय असावी, याची जुगाडबाजी आणि व्यूहरचना करण्यास सगळ्याच पक्षांनी प्रारंभ केला आहे. एक्ङिाट पोल कितीही खोटे ठरवले तरी त्यातून एक ट्रेण्ड दिसत असतो. त्यामुळे बहुमत कुणाला नाही आणि ज्या आघाडय़ा अन् युत्या मतदानाआधी टाळल्या, त्या मतदानानंतर करणो भागच पडणार आहे, असा कौल मतदारांनी दिला तर त्यासाठी सज्ज राहण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि विवेक पंडित असे दोन मोहरे ज्या पक्षाला बहुमताची गरज असेल, त्यांच्यासाठी उपलब्ध असतील. बविआचे असेच ठाणो जिल्ह्यातील उमेदवार तसेच अपक्ष असलेले गणपत गायकवाड यांचे भवितव्य काय असेल? आणि ते विजयी झाले तर आपल्याकडे कसे वळतील, या दृष्टीनेही प्रयत्न सुरू झाले आहेत. पालघर जिल्ह्यात बविआचे चार उमेदवार सध्या तरी प्रभावी वाटत आहेत. ते विजयी झाले तर त्यांचा कल कुठे असेल, याची चाचपणी सुरू आहे. त्यांच्याशी जवळीक असणा:या नेत्यांद्वारे त्यांच्याशी संपर्क स्थापित करण्याचे काम सुरू आहे. ठाणो जिल्ह्यात कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड हे माजी अपक्ष आमदार पुन्हा निवडणूक लढवत आहेत. ते अपक्षच राहिले आहेत. त्यामुळे जर ते निवडून आले तर त्यांना आपल्याकडे कसे वळविता येईल, या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. 
बहुजन विकास आघाडीने ठाणो जिल्ह्यातील काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले असले तरी त्यांचा प्रभाव पालघरमधील मतदारसंघांत जेवढा आहे, तेवढा ठाण्यातील मतदारसंघांत जाणवत नाही. त्यामुळे त्याचे प्रतिबिंबही या प्रयत्नात जाणवते आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी या दृष्टिकोनातून आपल्या पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांच्या टीम या कामासाठी अॅक्टीव्हेट केल्या आहेत. त्याचप्रमाणो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार कुठे-कुठे प्रभावी ठरू शकतील आणि ते निवडून आले तर त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी काय करावे लागेल, याचीही व्यूहरचना प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली आहे. (विशेष प्रतिनिधी)
 
4आकडेमोड करून कोणत्या परिस्थितीत कसे चित्र साकारेल व त्याचा उपयोग आपल्या फायद्यासाठी कसा करून घेता येईल, याची खटपट सुरू
 
4नाती, गोती, मैत्री यांचा वापर करून संभाव्य विजेते निकालापूर्वीच आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न
 
4आपल्यावर जर कुणाला साहाय्य करण्याची वेळ आली तर जास्तीतजास्त लाभ पदरात कसा पाडून घ्यायचा, याचीही व्यूहरचना सुरू