Join us  

आता मुंबई मेट्रोतही फर्स्ट क्लासचा डबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 5:50 AM

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमधील फर्स्ट क्लासच्या डब्याप्रमाणेच मुंबईतील मेट्रोमध्येही आता फर्स्ट क्लासचा डबा असणार आहे. ही माहिती एमएमआरडीएच्या अधिकृत सूत्रांकडून ‘लोकमत’ला मिळाली आहे. अशा प्रकारे मेट्रोमधील फर्स्ट क्लासचा डबा सध्या देशात फक्त चेन्नई मेट्रोमध्ये आहे. त्याच धर्तीवर मुंबई मेट्रोमध्येही फर्स्ट क्लासचा डब्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

- अजय परचुरेमुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमधील फर्स्ट क्लासच्या डब्याप्रमाणेच मुंबईतील मेट्रोमध्येही आता फर्स्ट क्लासचा डबा असणार आहे. ही माहिती एमएमआरडीएच्या अधिकृत सूत्रांकडून ‘लोकमत’ला मिळाली आहे. अशा प्रकारे मेट्रोमधील फर्स्ट क्लासचा डबा सध्या देशात फक्त चेन्नई मेट्रोमध्ये आहे. त्याच धर्तीवर मुंबई मेट्रोमध्येही फर्स्ट क्लासचा डब्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारण (एमएमआरडीए) कडून मेट्रो २ अ आणि मेट्रो २ ब या प्रकल्पांचे काम सुरू आहे. मेट्रो-७ च्या कामालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. मेट्रो-४, मेट्रो-५ आणि मेट्रो-६ या प्रकल्पांची कामेही लवकरच सुरू होणार आहे. या मेट्रोच्या सर्व प्रकल्पांमध्ये सहा डब्यांमधील एक डबा फर्स्ट क्लासचा ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएकडून घेण्यात आला आहे. मात्र सध्या घाटकोपर ते वर्सोवादरम्यान सुरू असलेल्या मेट्रो-३ मध्ये ही सुविधा नसेल.मेट्रोच्या सर्वसाधारण तिकिटाच्या दरापेक्षा मेट्रोच्या फर्स्ट क्लासच्या डब्यासाठीचे तिकीट दर आणि मासिक पास अधिक असणार आहे, मात्र ते कीती असतील हे अद्याप समजू शकलेले नाही.फर्स्ट क्लासच्या डब्यातील सुविधाच्मेट्रोमध्ये आता असलेल्या आसनव्यवस्थेपेक्षा अजून आरामदायी आसनव्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न या फर्स्ट क्लासच्या डब्यासाठी एमएमआरडीए करणार आहे.च्मोबाइल चार्जिंग, वायफायची सुविधा आणि पुशबॅक सीटची व्यवस्थाही येथे प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. 

टॅग्स :मेट्रोमुंबई