Join us

मुंबईत नेमणार आता डास अळी शोधक

By admin | Updated: January 31, 2015 02:33 IST

मुंबई शहर आणि उपनगरातील डेंग्यूचा फैलाव कमी करण्यासह डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महानगरपालिका आता डास अळी शोधकाची नियुक्ती करणार आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील डेंग्यूचा फैलाव कमी करण्यासह डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महानगरपालिका आता डास अळी शोधकाची नियुक्ती करणार आहे.महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने डेंग्यूला रोखण्यासह काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत आणि काय करण्यात येत आहेत? याची माहिती देण्यासाठी यासंदर्भातील विविध बाबींचे सादरीकरण महापालिका मुख्यालयात करण्यात आले; या वेळी प्रशासनाने ही माहिती दिली. अनेक वेळा इमारती, चाळी, झोपड्या अशा अनेक वास्तव्य असलेल्या ठिकाणी पाणी साचल्यानंतर येथील लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचू लागते. विशेषत: डेंग्यूने थैमान घातल्यानंतर तर अनेकांना जीव गमवावा लागतो. (प्रतिनिधी)