Join us

..आता सनी लिओनी प्राण्यांच्या प्रेमात ( फोटो स्टोरी)

By admin | Updated: October 5, 2016 16:04 IST

आपल्या हॉट, बोल्ड, मादक अदांसाठी नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवुड अभिनेत्री सनी लिओनींचे प्राण्यांवरही तितकेच प्रेम आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ५ - आपल्या हॉट, बोल्ड, मादक अदांसाठी नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवुड अभिनेत्री सनी लिओनींचे प्राण्यांवरही तितकेच प्रेम आहे. आपल्या व्यस्त दिनक्रमातून सनीला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती प्राण्यांसोबत वेळ घालवून ताण हलका करते. 
 
सनीचा पती डॅनियल वेबरलाही प्राण्यांची विशेष आवड आहे.  प्राण्यांबद्दल असलेल्या याच आकर्षणातून सनी आणि तिच्या पतीने बुधवारी पेटाच्या जुहू येथील कार्यालयाला अचानक धावती भेट दिली. प्राणी संरक्षणासाठी काम करणा-या पेटाच्या कार्यालयात अचानक सनीला पाहून काहीवेळासाठी तिथे काम करणा-या कर्मचा-यांना आश्चर्याचा धक्का बसला. 
 
आणखी वाचा 
 
सनीने यावेळी तिथे असलेले श्वानाचे पिल्लू आणि मांजरीला उचलून घेत त्यांच्यावर मायेने हात फिरवला व प्राण्यांच्या देखभालीविषयी पेटाच्या सदस्यांबरोबर चर्चा केली. पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनीचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. अल्पावधीत तिने इथे स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.