Join us  

पालिकेच्या विभाग कार्यालयांत आता 719 सीसीटीव्हींची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 8:41 AM

२००८मध्ये मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची सुरुवात पालिका मुख्यालयाबाहेरून झाली होती. पालिका मुख्यालयात अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेने मुख्यालयाच्या सात प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच ठेवला आहे.

मुंबई : महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांत सुरक्षिततेसाठी ७१९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मे. समर्थ सिक्युरिटी सिस्टीम (इं) प्रा. लि. या ठेकेदाराला याचे कंत्राट देण्यात येणार आहे. मात्र यासाठी महापालिका तब्बल सात कोटी ६२ लाख रुपये मोजणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती बैठकीत बुधवारी मंजुरीसाठी प्रशासनाने मांडला आहे.२००८मध्ये मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची सुरुवात पालिका मुख्यालयाबाहेरून झाली होती. पालिका मुख्यालयात अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेने मुख्यालयाच्या सात प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच ठेवला आहे. त्याप्रमाणेच पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांतही आता ७१९ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र ही यंत्रणा पुरविणाऱ्या ठेकेदाराचे कंत्राट संपुष्टात येत असल्याने आता दुसरा ठेकेदार नेमण्याची गरज आहे.यासाठी पालिकेने काढलेल्या निविदेनुसार दोन ठेकेदारांनी भाग घेतला होता. मात्र सर्वात कमी बोली लावणाऱ्या मे. समर्थ सिक्युरिटी सिस्टीम प्रा. लि. या ठेकेदाराला पात्र ठरविण्यात आले आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कार्यादेश मिळताच पुढील सहा महिन्यांत पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांतील आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यान्वित करणे बंधनकारक असेल. ही कॅमेरा सेवा देताना दोन वर्षांचा हमी कालावधी असणार आहे.

विभाग कार्यालयांत ४५९ डोम कॅमेरेपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांत ४५९ डोम कॅमेरे, २१९ बुलेट कॅमेरे आणि ४१ पी.टी. झेड कॅमेरे असे एकूण ७१९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

आर उत्तर - दहिसर - ५६, जी उत्तर - माहीम, धारावी, दादर - ४५, एम पश्चिम - चेंबूर - ४४, के पूर्व - जोगेश्वरी, अंधेरी पूर्व, - ४३ अशा प्रकारे विभाग कार्यालयात सर्वाधिक सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबईसीसीटीव्ही