Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता मच्छीमारांनाही कर्जमाफी द्या- मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:37 IST

  नैसिर्गक आणि मानव निर्मित प्रदूषणामुळे सागरी मासेमारी डबघाईला आल्यामुळे मच्छीमार समाज कर्जाच्या ओझ्या खाली दबला गेला असून त्याला कृषी कर्जमाफी प्रमाणे कर्ज माफी दिली जावी अशी मागणी मच्छीमार नेत्यांनी केली आहे.

- शौकत शेखडहाणू -  नैसिर्गक आणि मानव निर्मित प्रदूषणामुळे सागरी मासेमारी डबघाईला आल्यामुळे मच्छीमार समाज कर्जाच्या ओझ्या खाली दबला गेला असून त्याला कृषी कर्जमाफी प्रमाणे कर्ज माफी दिली जावी अशी मागणी मच्छीमार नेत्यांनी केली आहे.मासेमारी व्यवसाय यांत्रिक बोटीने करण्या साठी वीस पंचवीस वर्षा पूर्वी केंद्र आणि राज्य सरकारच्या राष्टीय विकास सहकार निगम आणि इतर योजना अंतर्गत मच्छीमाराना कर्ज आणि अनुदान दिले गेले होते, त्यावर दहा ते पंधरा टक्के व्याज लावण्यात आले होते. मात्र मच्छीमारांचे उत्पन्न अगदीच तुटपुंजे झाल्याने कर्जाचे हप्ते मुदतीत फेडले गेले नाहीत. त्यामुळे मिळालेल्या अनुदानाचे रूपांतर कर्जात होउंन त्यावर देखिल व्याज आकारणी करण्यात आली, यामुळे मच्छीमारांवर कर्जाचा प्रचंड बोजा निर्माण झाला आहे. त्यातच यांत्रिक नौका नादुरुस्त होऊन बंद पडल्या, तर काही फुटून गेल्या, तरीही सरकारने सक्तीची कर्ज वसूली केल्याने मच्छीमारांसमोर आत्महत्ये शिवाय आता कोणताही पर्याय राहिलेला नाही, त्यासाठी मोटार वाहन कायद्या प्रमाणे जुन्या बोटी भंगारात काढून त्यांचे कर्ज माफ करणे आवश्यक आहे. शिवाय नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकºयांना सरकार नुकसान भरपाई देऊन त्यांचे शेती कर्ज माफ करते त्यांच्या उभारीसाठी आर्थिक सहाय्य देते. त्या प्रमाणे मच्छीमारावर असलेले कर्ज माफ करून त्यांचा व्यवसाय सुरळीत चालावा म्हणून आर्थिक सहाय्य करण्यात यावे, अशी मागणी मच्छीमारा नेता आणि ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे संचालक अशोक अंभिरे यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका निवेदना द्वारे केली आहे.

टॅग्स :वसई विरार