Join us

ट्रकवाले, बार्जमालकांना कर्जमुक्ती योजना आज अधिसूचित : 35 टक्क्यांपर्यंत भार सरकार उचलणार

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST

ट्रक, बार्जमालकांना कर्जमुक्ती योजना आज अधिसूचित

ट्रक, बार्जमालकांना कर्जमुक्ती योजना आज अधिसूचित
: 35 टक्क्यांपर्यंत भार सरकार उचलणार
पणजी : खाण अवलंबित ट्रक, मशिन, तसेच बार्जमालकांसाठी कर्जमुक्तीची योजना सोमवारी(दि. 1) अधिसूचित केली जाणार आहे. बार्जमालकांकरिता कर्जाच्या मुद्दल रकमेत 35 टक्के भार सरकार उचलणार आहे. सरकारला जास्तीत जास्त 400 कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. ट्रकमालकांना किमान 15 लाख व मशिन, तसेच बार्जमालकांना 25 लाख रुपयांपर्यंत फायदा होईल. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी राजभवनवर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
बँकांकडूनही या कर्जधारकांना दिलासा मिळणार आहे. एकरकमी कर्जफेडीसाठी ही योजना अधिसूचित झाल्यानंतर संबंधित बँकांकडून प्रस्ताव मागविले जातील आणि त्यानुसार कर्जमाफी दिली जाईल. 30 ते 35 टक्के भार सरकारने उचलल्यास आणि बँकांनीही तेवढीच सवलत दिल्यास केवळ 30 टक्के स्वत:ची रक्कम भरून ट्रकमालकांना कर्जमुक्त होता येईल. बार्जमालकांच्या डोक्यावर एकूण सुमारे 280 कोटींचे कर्ज आहे. त्यात सुमारे 160 कोटी राष्ट्रीयीकृत बँकांचे, 92 कोटी सहकारी बँकांचे, 20 कोटी वित्तीय कंपन्या व खासगी बँकांचे तर 8 कोटी ईडीसीचे कर्ज आहे. या कर्जावरील व्याजाची रक्कमच 76 कोटींवर पोहोचली आहे. ट्रकमालकांचे विविध बँकांमध्ये 130 कोटींचे कर्ज आहे. ही योजना वास्तविक 21 ऑगस्टपर्यंत येणार होती. 18 ऑगस्ट रोजी खाण लीज धोरणावरील चर्चेत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु ती लांबली आणि आता सोमवारी अधिसूचित होत आहे.
दरम्यान, ट्रकांवरील चालक, तसेच इतर कामगारांसाठीही लवकरच योजना येणार आहे. ती 26 ऑगस्टपर्यंत येणार असे जाहीर केले होते; परंतु ते प्रत्यक्षात आले नाही. खाण अवलंबित हॉटेल, गाडे, गॅरेजमालक यांच्याकरिता 15 ऑक्टोबरपर्यंत एकरकमी अर्थसाहायाची योजना येणार आहे. (प्रतिनिधी)