Join us

राजकीय नेत्यांच्या ताब्यातील उद्यान, मैदानांना पाठवणार नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 06:15 IST

मुंबई : भाडेतत्त्वावर दिलेल्या २१६ पैकी १८७ मनोरंजन मैदाने व उद्याने महापालिकेने ताब्यात घेतली आहेत.

मुंबई : भाडेतत्त्वावर दिलेल्या २१६ पैकी १८७ मनोरंजन मैदाने व उद्याने महापालिकेने ताब्यात घेतली आहेत. मात्र, शिवसेना व भाजपा नेत्यांच्या संस्थांच्या ताब्यात असलेले ३० मोकळे भूखंड ताब्यात घेण्यात पालिकेला यश आलेले नाही. या संस्थांना पालिका प्रशासन सोमवारी नोटीस पाठविणार आहे. मात्र, यापैकी अनेक संस्था त्या मैदान अथवा उद्यानावर केलेल्या खर्चाची भरपाई मिळण्याची मागणी करीत असल्याने पालिकेची अडचण वाढली आहे.मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, महापालिकेने खासगी संस्थांना दिलेली मनोरंजन मैदाने व उद्यानांची जागा ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार, १८७ मैदाने व उद्याने ताब्यात घेण्यात आली आहेत. मात्र, राजकीय नेत्यांच्या संस्थांकडे असलेल्या भूखंडांवरील हक्क सोडण्यासाठी संस्थेला नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे असे ३० भूखंड परत मिळवण्याचे महापालिकेचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांच्या संस्थेच्या ताब्यात असलेले दहिसर स्पोर्टस फाउंडेशन आणि भाजपा आमदार रमेश सिंह ठाकूर यांच्या ताब्यात असलेले कांदिवली ठाकूर संकुलमधील खेळाचे मैदान हे भूखंड पालिकेने याआधीच ताब्यात घेतले आहेत. आता शिवसेना नेते राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचे मातोश्री मीनाताई ठाकरे उद्यान व राज्यमंत्री रामदास कदम यांच्या संस्थेकडे असलेले कांदिवली येथील उद्यान, खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संस्थेकडे १० एकर जागेवर असलेला पोईसर जिमखाना, सात एकरवरील वीर सावरकर उद्यानाची देखभाल करणाºया संस्थांना नोटीस पाठविण्यात येणार असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.>१८७ भूखंड ताब्यात घेतलेमुंबईतील २१६ मैदाने व उद्यानांपैकी १८७ भूखंड पालिकेने ताब्यात घेतले आहेत.शिवसेना नेते व मंत्री सुभाष देसाई, भाजपा आमदार विद्या ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या संस्थेकडे असलेली गोरेगाव येथील मैदानेही पालिका ताब्यात घेणार आहे.मुंबईत माणशी १.०९ चौरस मीटर मोकळा भूखंड आहे़, तर नियमांनुसार माणशी १० ते १२ चौरस मीटर मोकळी जागा असणे अपेक्षित आहे.