Join us
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी पथदिव्यांप्रकरणी पालिका आयुक्तांना नोटीस

By admin | Updated: February 25, 2015 03:52 IST

एलईडी दिव्यांनी मुंबईला नवीन झगमगाटात आणण्याच्या भाजपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शिवसेनेपाठोपाठ आता मनसेकडूनही विरोध होऊ लागला आहे़

मुंबई : एलईडी दिव्यांनी मुंबईला नवीन झगमगाटात आणण्याच्या भाजपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शिवसेनेपाठोपाठ आता मनसेकडूनही विरोध होऊ लागला आहे़ याबाबतचा प्रस्ताव तातडीने स्थायी समितीपुढे आणण्याचा घाट भाजपाने घातला आहे़ मात्र निविदा न मागविताच कंत्राट दिल्यास कोर्टात खेचू, अशी कायदेशीर नोटीस मनसेने आयुक्त सीताराम कुंटे यांना पाठविली आहे़मुंबईतील १ लाख ३२ हजार दिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्याचा केंद्राचा प्रकल्प आहे़ केंद्र व राज्यात भाजपा सरकार असल्याने मित्रपक्ष शिवसेनेला अंधारात ठेवून या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली़ तरीही आतापर्यंत मूग गिळून बसलेल्या शिवसेनेने अखेर मरिन ड्राइव्ह येथील एलईडी दिवे बसविण्यावर आक्षेप घेतला़ यावरून युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ आशिष शेलार यांच्यामध्ये टिष्ट्वटर वॉरही रंगले़एलईडी दिव्यांनी मरिन ड्राइव्ह परिसराची शोभा गेली़ हे प्रकरण पुरातन वास्तू समितीपुढे नेऊन शिवसेनेने भाजपाला शह दिला आहे़ तरीही हा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून स्थायी समितीच्या उद्याच्या बैठकीत आणण्याचे घाटत आहे़ मात्र प्रस्ताव घाईने मंजूर केल्यास उच्च न्यायालयात खेचू, असा सज्जड इशारा मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी कायदेशीर नोटीसद्वारे आयुक्त कुंटे यांना आज दिला़ (प्रतिनिधी)