Join us

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:08 IST

जरंडेश्वर कारखाना कर्ज पुरवठा प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने ...

जरंडेश्वर कारखाना कर्ज पुरवठा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याला कर्ज पुरवठा करणाऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही त्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. या बँकेने ‘जरंडेश्वर’ला ८० कोटींचे कर्ज पुरविले होते. कारखान्याची ऐपत नसताना त्यांना हे कर्ज कशाच्या आधारावर मंजूर करण्यात आले, त्यासाठी तारण काय घेण्यात आले, आदीबाबत सविस्तर तपशील ईडीला हवा असल्याचे सुत्रांनी सांगितले. सातारा व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला अशाप्रकारे यापूर्वी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी १० दिवसांचा वेळ देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र सहकारी बँकेच्या २५ हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीने १२ दिवसांपूर्वी ६५ कोटी ७५ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांवर केलेल्या कारवाईचे पडसाद राजकीय क्षेत्रात उमटले होते.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कोरेगाव तालुक्यातील चिमणगावमधल्या जरंडेश्वर कारखान्याला ८० कोटींचे कर्ज पुरविले होते. २०१४मध्ये बँकेने हे कर्ज देताना कोणत्या आधारावर दिले, कागदपत्रांची पूर्तता नेमकी कशी केली गेली होती, कर्ज प्रकरणाची प्रोसेस नेमकी कशी झाली, ही प्रोसेस होताना नियम आणि अटींचे पालन झाले होते का? याबाबत ईडी चौकशी करणार आहे.