मुंबई : पीडीएफ फॉरमॅटमध्ये व्हॉट्सअॅपद्वारे कंपनीने पाठविलेली नोटीस प्राप्तकर्त्याला मिळाली असून, त्याने ती वाचल्याने उच्च न्यायालयाने ती वैध असल्याचे नुकतेच म्हटले आहे.मुंबईचे रोहित जाधव नोटीस घेत नसल्याने एसबीआय कार्ड््स अँड पेमेंट्स सर्व्हिसेस प्रा.लि.च्या अधिकृत अधिकाऱ्याने त्यांना व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठविली. ‘प्रतिवाद्याने मेसेज, वाचल्याचे आयकॉन इंडिकेटरवरून स्पष्ट होते,’ असे न्या. गौतम पटेल यांनी म्हटले. प्रतिवाद्याने कंपनीचे कॉल घेणे बंद केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्याचा पत्ता पुढील सुनावणीस देण्याचे निर्देश न्यायलयाने कंपनीला दिले. त्यामुळे न्यायालय प्रतिवाद्यावर वॉरंट काढू शकेल.
पीडीएफ फॉरमॅटमधील नोटीस व्हॉट्सअॅपद्वारे पाठविणे वैध - उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 06:42 IST