Join us
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.ने विनातिकीट प्रवास महागात पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एस.टी. महामंडळाने एस.टी.मधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एस.टी. महामंडळाने एस.टी.मधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान विनातिकीट प्रवासी आढळल्यास संबंधितांकडून चुकविलेल्या भाड्याव्यतिरिक प्रवासी भाड्याच्या दुप्पट रक्कम वसूल करण्यात येणार आहे. हा दंड टाळण्यासाठी प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन एस.टी. महामंडळाने केले आहे.

प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत एस.टी. महामंडळ तिकीट तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेत विभागातील मार्ग तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश केला जाणार आहे.

हे सर्व अधिकारी विनातिकीट प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम राबविणार आहेत. यावेळी विनातिकीट प्रवास करताना प्रवासी आढळल्यास त्यांच्याकडून चुकविलेल्या भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसूल करण्यात येईल. त्यामुळे एस.टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये तसेच तिकीट काळजीपूर्वक जपून ठेवावे, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.