Join us

एसटी महामंडळाकडून विनाअपघात सुरक्षितता मोहीम

By admin | Updated: January 10, 2017 07:07 IST

एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाने १0 जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंत विना

मुंबई : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाने १0 जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंत विना अपघात सुरक्षितता मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास निर्माण व्हावा, कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत विशेष भिंतीपत्रके तयार करण्यात आली आहेत. राज्यातील बस स्थानके, नियंत्रण कक्ष, कर्मचारी विश्रांतीगृहे येथे भिंती पत्रके करण्यात येतील. तसेच यादरम्यान चालकांना वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही केले जाईल.